Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सिटू सुवर्णमहोत्सवी दिन साजरा

---Advertisement---

औरंगाबाद(प्रतिनिधी) :- सेेंंटर ऑफ 

ट्रेंड युनियन(सिटू) च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन सीटू भवन अजब नगर व बजाज नगर येथे उध्दव भवलकर व सतिश कुलकर्णी याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

         वाळूज औद्योगीक परिसरातील २१ कारखाने तर चिकलठाणा , शेंद्रा,रेल्वे स्टेशन, चित्तेगांव पैठण रोड, भालगांव,नांदेड,जालना, गंगापूर औद्योगिक परिसरातील २३ कारखाने मधील संघटीत क्षेत्रातील १९५० कामगाररानी ध्वजारोहनात सहभाग घेतला.

         कामगार वस्त्यामधील २५० कामगार व त्यांचे कुटूंबीय सामिल झाले. असंघटीत क्षेत्रातील आशा आणि शालेय पोषन अहार कामगार ३५० सामिल झाले. आरोग्य क्षेत्रातील दवाखान्यातील २२५ कामगार असे एकून २७७५ संघटीत असंघटीत क्षेत्रातील कामगारानें  सुवर्णमहोत्सवी दिनांच्या सांगता कार्यक्रमात मोठ्या उत्सहाने भागीदारी करून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.

लाॅकडाऊन मुळे लाखो कामगांर ७०० -८०० कि. मी. लहान मुले व  जेष्ठ नागरिक यानां घेऊन चालले यामुळे ७२ वर्षानंतर ही एवढी प्रचंड गरिबी व दारिद्रया देशातील जनतेसमोर आले आहे. आज ही देशातील शेतकरी, शेतमजूर ,कंत्राटी कामगार, बेरोजगार युवक उपासमारीत सापडला आहे, ११ वर्ष बाजपेयी आणि मोदी च्या भाजप सरकारने श्रमिक वर्गासाठी काही केले नाही. देशाची अर्थव्यवस्था गहान ठेवली आहे. म्हणून देशातील मजदूर किसानाने संकल्प केला आहे की वर्गीय एकजूट करूण येणाऱ्या काळात व्यवस्था बदलासाठी संघर्ष करणार हा संकल्प कामगारांना केला आहे.

            हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उध्दव भवलकर, लक्ष्मण साक्रूडकर , दामोदर मानकापे ,विश्वनाथ शेळके, मंगल ठोबंरे, गोरख राठोड, बसवराज पटने, सतिश कुलकर्णी, नागनाथ बडे, श्रीकांत पोपसे, धम्मपाल प्रधान, यानी प्रयत्न केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles