Friday, May 10, 2024
Homeग्रामीणकोल्हापूरात विविध संघटनांच्या वतीने 'सिटू'चा सुवर्णमहोत्सवी दिन साजरा

कोल्हापूरात विविध संघटनांच्या वतीने ‘सिटू’चा सुवर्णमहोत्सवी दिन साजरा

कोल्हापूर(प्रतिनिधी):- सेंटर ऑफ ट्रेंड युनियनचे कोल्हापूर, आशा वर्कर्स, एमएसएमआरए आदी संघटनांच्या वतीन सिटूचा सुवर्णमहोत्सवी दिन साजरा करण्यात आला. सिटूचे कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरात आशा वर्कर्स व कामगार प्रतिनिधी यांनी लाल झेंड फडकवले.

            एमएसएमआरए या मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेने राजारामपुरी येथील ऑफिसजवळ झेंडा फडकवला. तसेच मानवी साखळी करून सिटू जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, एमएसएमआरए जिंदाबाद आदी घोषणा देण्यात आल्या. यानंतर विवेक गोडसे यांनी कामगार कायद्यातील परिस्थिती आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाबाबत मार्गदर्शन केले.

    यावेळी विजय धनवडे, सचिन पाटील, प्रशांत सावंत, प्रशांत कुलकर्णी, दीपक मुसळे, वैभव वाडकर, प्रसाद देसाई, अमित पाटील, प्रशांत बरगे,  नवनाथ मोरे आदीसह उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय