Saturday, April 27, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : उन्हाळ्यात बाळाचं आरोग्य : हे तुम्ही त्याला देत असलेल्या...

विशेष लेख : उन्हाळ्यात बाळाचं आरोग्य : हे तुम्ही त्याला देत असलेल्या आहारावरच अवलंबून असतं


Baby’s Health in Summer : वाढलेले तापमान आणि कडक उष्णतेमुळे उन्हाळा विशेषतः लहान मुलांना अधिक त्रासदायक वाटू शकतो. उन्हाळ्यातील उष्णता तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरू शकते कारण त्याची प्रतिकार शक्ती कमी असते आणि उष्णतेमुळे ते सहजपणे प्रभावित होऊ शकतात. नवजात आणि लहान मुलांना त्यांच्या त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ येण्याची शक्यता असते तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही काही सावधगिरीच बाळगणे गरजेचे असते ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला उन्हाळ्यात निरोगी राहण्यास मदत होईल.

आपल्या बाळाची योग्य काळजी घेणं अधिक गरजेचं असतं. नव्यानं आई-बाबा झालेले अनेकदा उन्हाळ्यातील काही समस्यांमुळे गोंधळून अथवा घाबरून जातात. त्यांना अनेक प्रश्न भेडसावतात. बाळाच्या काळजीसाठी काही महत्त्वाच्या युक्त्या या लेखाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. पालकांनी या महत्त्वाच्या बाबींचं पालन करावं. इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात आपल्या बाळाची काळजी घेणं अधिक आव्हानात्मक असतं. डायपरमुळे काही समस्या लहान मुलांमध्ये दिसून येतात. आपल्या बाळाला अशा समस्यांपासून कसं दूर ठेवता येईल त्याकरिता काही खास टिप्स खालीलप्रमाणे. Baby’s Health in Summer

१) सुती कपड्यांची मदत घ्या, फॅब्रिक कपडे घालणे टाळावे. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मुलांना सुती कपडेच घालावेत. त्यामुळे मुलांना खूप आराम वाटेल. कडक उन्हात बाहेर घेऊन जाऊ नये, उन्हापासून बचाव करण्यासाठी मुलांचे डोके सुती कपड्याने झाकायला विसरू नका.

२) मुलांची त्वचा पुरळ मुक्त ठेवण्यासाठी कॉटन नॅपी घालणे चांगले. लंगोट बदलताना मुलांच्या त्वचेवर थोडी हवा येऊ द्या. एकदम घट्ट लंगोट बांधू नका,याशिवाय लहान मुलांना पुरळमुक्त, त्वचा कोरडी ठेवण्यासाठी बेबी क्रीम किंवा पावडरची मदत घ्या.

३) त्यांना अति थंड, फ्रिज मधील पाणी देऊ नका, सर्दी होऊ शकते.
त्यांना भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न करा. पाण्यामुळे मुलांच्या शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याला निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी स्तनपान करा.

४) बाळाला तेलाने मसाज करताना हलक्या हाताने करा. हे विश्रांतीस प्रोत्साहन देते, झोप सुधारण्यास मदत करते, तेल निवडताना, बाळासाठी सुरक्षित तेलाची निवड करणे आणि मसाज करताना सौम्य, गोलाकार हालचाली वापरणे आवश्यक आहे. तुमच्या बाळाच्या झोपायच्या वेळी मसाज केली की,त्यांना छान झोप लागते.

५) उन्हाळ्यात तुमच्या बाळासाठी थंड आणि आरामदायी वातावरण घरात असले पाहिजे, खोलीचे तापमान 68°F ते 72°F दरम्यान असल्याची खात्री करा आणि खोली हवेशीर ठेवण्यासाठी पंखा किंवा वातानुकूलन वापरा. हलके आणि श्वास घेण्यायोग्य बेडिंग वापरा आणि हवा ओलसर ठेवण्यासाठी कूलिंग पॅड किंवा थंड मिस्ट ह्युमिडिफायर वापरण्याचा विचार करा.
७) जुलाब होत असताना दूध न पाजणं हीदेखील मोठी चूक आहे. बाळाला व्हायरल किंवा पोटात इन्फेक्शन झाल्यानंतरकिरकोळ उलटी अथवा एक दोन जुलाब होणं हे अगदी सामान्य आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरज असल्यास ORS देखील द्यावं. पण दूध अजिबात न पाजणं अधिक धोकादायक ठरू शकते. Baby’s Health in Summer

या चुका करू नका

१ प्रामुख्यानं ग्रामीण भागातील महिला. सहाव्या महिन्यानंतर अगदी सात, आठ महिन्यानंतरही इतर पूरक आहार सुरू करत नाहीत.

२) नोकरदार महिला या प्रामुख्यानं शहरी भागात राहत असतात. सहा महिन्यांची सुटी संपल्यानंतर बाळाला बाटलीच्या मदतीनं दूध पाजणं त्या सुरू करतात.त्या ऐवजी एखाद्या चांगल्या भांड्यात दूध घेऊन ते चमच्याने पाजावे, किंवा दूध युक्त नाचणी पीठ, बाळ थोडे मोठे झाले की, दूध भात द्यावा

३) कामावर जात असल्यामुळं मुलांना बाजारात पाकिटबंद अन्न खाऊ घालणं. विदेशातून आयात केलेल्या डबाबंद अशा आहाराचे काहीसे स्वस्तातील डबे वापरणं हे पण बरोबर नाही, कुल्फी, आइस्क्रीम देऊ नये.
४) घरात कामवाली बाई असेल तर तिची स्वच्छता तपासावी, ती धुणी भांडी, स्वयंपाक करत असेल,आणि तुम्ही कामाला जात असाल तर बाळाचे स्वतंत्र जेवणाचे भांडे असावे, ते इतर भांड्यात मिक्स केले जाते, कामवाली बाईला त्याच भांड्यातून पोषक आहार द्यायला लावा.
५) आई जे काही खाते त्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न खात असेल तर त्याचा परिणाम मुलांवर दिसून येतो. यामुळे त्याला पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो आणि मूल रडू लागते. मातेचा आहार सात्विक असावा, मांसाहार केला तर खूप मसालेदार करून खाऊ नये

*उन्हाळी आजारात लहान मुलांना पोटात दुखते आणि खूप वेदना होतात. या आजारात मुले अनेक तास रडत राहतात. अशा वेळी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. बाळाला दृष्ट लागली असे समजून काही उपचार करू नका. थोडक्यात बाळाचे उन्हापासून संरक्षण करणे, बाळाला पातळ सुती कपडे घालणे, त्याला भरपूर द्रव पदार्थ देणे, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे याप्रकारे काळजी घेतल्यास बाळाचा उन्हाळा सुसह्य होऊ शकतो.

-डॉ.प्रतिभा कुलकर्णी

पत्ता – जय महाराष्ट्र चौक आळंदी रोड भोसरी, पुणे – ४११०२६

whatsapp link

हे ही वाचा :

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय