Sunday, April 28, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : औरंगाबादसह 'या' शहरांच्या नामकरणास मान्यता

मोठी बातमी : औरंगाबादसह ‘या’ शहरांच्या नामकरणास मान्यता

मुंबई : शिंदे गटाने बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. उद्या ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सोमोरे जायचे आहे. या अगोदरच ठाकरे सरकारने काही माठे निर्णय घेतले आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता

उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता

नवी मुंबई विमानतळालाही दि. बा. पाटलांचे नाव देण्यास मान्यता

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय