Sunday, April 28, 2024
Homeराज्यमोठी बातमी : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

मोठी बातमी : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती नायडू कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी या पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 5 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 20 जुलै रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 जुलै असणार आहे. 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर या तारखा जाहीर करण्यात आल्या.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी येत्या 22 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने महिला आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्त उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय