Sunday, December 8, 2024
Homeराज्यबाजारासाठी बकऱ्या घेऊन जाणाऱ्या वाहनांचा तिहेरी अपघात, ५ जण ठार तर ६...

बाजारासाठी बकऱ्या घेऊन जाणाऱ्या वाहनांचा तिहेरी अपघात, ५ जण ठार तर ६ जण जखमी

जळगाव : फैजपूर येथील बाजारासाठी वाहनातून बकऱ्या घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने समोरून आलेल्या ट्रकने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या तिहेरी वाहनांच्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाला आहे.

जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच. ४३. एडी. १०५१ व एमएच.१९.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने फैजपूर येथील बाजारासाठी जात होते. त्यावेळी जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ भरधाव ट्रकने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. बुधवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या तिहेरी वाहनांच्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या अपघातात दोन्ही पिकअप वाहनांचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भयंकर होता की पाच जणांचा मृत्यू झाला. तर बोलेरो वाहनातील प्रवासी पुलाखाली फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय