Sunday, April 28, 2024
Homeराजकारण...हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे - संजय राऊत

…हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे – संजय राऊत

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. रात्री उशीरा भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश दिला आहे.

राज्यातील या सत्ता नाट्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे की, 16 आमदार निलंबन प्रकरणी दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 11 जुलै पर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधान सभेचे आधिवेशन 1 दिवसात बोलावतात हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे गुरूवारी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय