Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत विविध कार्यक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Alandi : आळंदीत विविध कार्यक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

आळंदी / अर्जुन मेदनकर : भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती आळंदी (Alandi) परिसरात विविध सेवाभावी संस्था, संघटना, सेवाभावी व्यक्ती, पदाधिकारी यांचे वतीने विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पांजली अर्पण करीत संविधान पूजन आणि संविधान पत्रिकेचे वाटप करण्यात आले.

येथील ज्ञानेश्वर विद्यालयात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दिपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, बाळासाहेब भोसले, योगेश मठपती, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी यशवंती कढणे, रुचिका वाघमारे या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्या विषयीचे विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची वेशभूषा धारण करणारा वेदांत मुरकुटे याने ‘मी बाबासाहेब बोलतोय’ एकपात्री नाट्य सादर केले. alandi news

दीपक मुंगसे, सूर्यकांत खुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवंत विचारांना उजाळा देत महापुरुषांचे कार्य हे विशिष्ट जाती – धर्मासाठी नसून ते समस्त मानवासाठी व त्यांच्या कल्याणासाठी आहे असे सांगितले.

अजित वडगावकर यांनी महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता व्यक्त करत सर्वांनी संविधान पुस्तिकेचे वाचन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले. आभार एस कांबळे मानले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून पसायदानाने सांगता झाली.

भारतरत्न डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत तसेच आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील यांच्या येथे जयंती साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे, शशिकांत बाबर, गोविंद ठाकूर तौर, रोहिदास कदम, मंगेश आंद्रे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. alandi news

शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण म्हणाले, संविधान देशात सुव्यवस्था प्रस्थापित करून ठेवण्याचा एकमेव उपाय आहे. अशा या अमूल्य महान संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थ ग्रुपचे वतीने भव्य दिव्य मिरवणुक भीमजय घोषात उत्साहात काढण्यात आली. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर येथून मिरवणूक जल्लोषात सुरु झाली.

आळंदी गावठाण परिसरातून शिवतेज चौक, महाद्वार चौक, चावडी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून उत्साहात झाली. सिद्धार्थ ग्रुप, समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांची मोठी उपस्थिती होती.

सिद्धार्थ ग्रुप ने मिरवणुकीचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचेसह आळंदी पोलिसांनी मिरवणुकीस मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे वतीने मिरवणुकीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. alandi news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय