Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMAVAL : मावळच्या सर्वसमावेशक विकासासाठी 'मशाल' लक्षात‌ ठेवा - संजोग वाघेरे

MAVAL : मावळच्या सर्वसमावेशक विकासासाठी ‘मशाल’ लक्षात‌ ठेवा – संजोग वाघेरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार‌ दौरा
खालापूर
: मावळ लोकसभा मतदार संघात ज्यांना संधी दिली, त्यांनी स्वतःसाठी काम केले. मतदारसंघासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले. मावळच्या विकासासाठी, गाव पातळीवरील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या “मशाल” चिन्हाचे बटन दाबून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला साथ द्या, असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी खालापूर मावळ परिसरातील मतदारांना केले. maval news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena Udhav Balasaheb Thakare) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी वडगाव मावळ परिसरात गावभेट दौरा केला.

या दौर्‍यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी वाघेरे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले. माता भगिनींनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले.

या वेळी वडगाव जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख कार्यकर्ते शिवसेना नेते उत्तम भोईर एकनाथ पिंगळे, सचिन मते, उत्तम भोईर, अध्यक्ष वडगाव विभागाचे अध्यक्ष सुनील थोरवे, पंचायत समिती अध्यक्ष गोरख रसाळ, राजेश मेहेतेतर, जिल्हा सल्लागार एस. एम. पाटील, वाशिवली ग्रामपंचायतीचे महादेव गडगे, जयवंत पाटील, दशरथ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक मुंढे, कॉंग्रेसचे अनंत पाटील, शेकापचे अनंत जाधव, जनार्धन पवार, तळवली येथील संतोष मालकर, भगवान पाटील, युवासेनेचे मंगेश पाटील, भारती लोत, रिया मालुसरे, अंकुश बामणे, अविनाश अम्ले यांच्यासह ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. maval news

वडगाव येथील जिल्हा परिषद विभागातील तूपगाव, पाली, सारंग, असरोटी, वयाल, बोरिवली, वडगाव, कैरे, कोपरी, लोहोप, माजगाव, वारद, पौंध, आसरेवडी, धारणी, खरसुंडी, वडवळ, तांबटी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी सवांद साधला.

यावेळी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. अनेक ठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. या सभांमध्ये मावळ लोकसभेत (maval loksabha 2024) शिवसेनेच्या उमेदवारास प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. maval news


दरम्यान, उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावांमधील प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. युवा पिढीबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांनी पदवीऐवजी व्यावसायिक कौशल्यावर विश्वास ठेवायला हवा. येणार्‍या काळात बेरोजगारीची समस्या सोडविल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

मागील दोन निवडणुकीत मत देऊन चूकच केली; ग्रामस्थांच्या भावना

विकास कामे होतील, गावाचा कायापालट होईल, म्हणून ग्रामस्थांनी त्यांना भरभरून मते दिली. मात्र, दहा वर्षांत कोणताच विकास झाला नाही. गावातील समस्या ‘जैसे थे’ आहेत. मते देऊन चूक केली, आज त्याचा पश्चाताप होत आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तळागाळातील सर्वसामान्यातला माणूस म्हणून संजोग वाघेरे पाटील यांची ओळख असून, येत्या निवडणुकीत त्यांना मत देवून लोकसभेत पाठवू, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. maval news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय