Friday, May 17, 2024
Homeराजकारणअमरावतीच्या कथित लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट, खासदार नवनीत राणा यांचा खोटेपणा...

अमरावतीच्या कथित लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट, खासदार नवनीत राणा यांचा खोटेपणा उघड

अमरावती : अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणाने गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून खासदार नवनीत राणा यांचे आरोप निराधार असल्याचे समोर आले आहे.

अमरावती येथे एका १९ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत जबरदस्तीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी केला होता. हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचाही आरोप करत राणा यांनी मोठे रान उठवले होते. मात्र आता खासदार नवनीत राणा यांचा खोटेपणा उघड झाला आहे. कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने घर सोडल्याची माहिती आता समोर आली आहे.

अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेली १९ वर्षीय युवती रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, सातारा पोलिसांच्या मदतीने या युवतीला रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. ही युवती एकटीच प्रवास करत असल्याचीही माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना फोन केला असता त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल केला होता. यावेळी पोलिस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी त्यांची जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा :

ब्रेकिंग : थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

एकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये जोरदार राडा !

मेगा बजेट 500 कोटींचा चित्रपट पी एस 1चा ट्रेलर लाँच !

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय