Saturday, May 18, 2024
Homeराज्यराज्यात पावसाचा जोर वाढणार, "या" जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊसाची शक्यता

राज्यात पावसाचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊसाची शक्यता

मुंबई, दि. ८ : मागील काही दिवस पावसाने दांडी मारल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई-ठाण्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात ९ ते ११ सप्टेंबरपर्यंत जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, ८ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार असून कोकण किनारपट्टीसह गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड व औंरंगाबाद या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडेल तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्हांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीसदृश पाऊसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

ब्रेकिंग : थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

एकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये जोरदार राडा !

मेगा बजेट 500 कोटींचा चित्रपट पी एस 1चा ट्रेलर लाँच !

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय