Monday, May 6, 2024
Homeराजकारणअडीच महिन्यांपासून कोणत्याही जिल्ह्याला पाकलमंत्री मिळालेला नाही खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य...

अडीच महिन्यांपासून कोणत्याही जिल्ह्याला पाकलमंत्री मिळालेला नाही खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

पुणे : ज्या पद्धतीने सत्ताधारी बारामतीबाबत प्रेम आणि उत्सुकता दाखवतात त्याचे मी मनापासून स्वागत करते, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लगावला. माझा संविधानावर विश्वास आहे. संविधानानुसार प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी बारामतीला गेले तर त्यात काही गैर नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामती दौऱ्यावर येणार आहे, त्यावर सुप्रिया सुळे बोलत होत्या.

२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार जिंकेल, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर आज सुप्रियाताईंनी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएममध्ये ॲडमिशन हवे असते कारण त्या उत्तम शैक्षणिक संस्था आहेत. त्याप्रमाणेच बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील खूप विकसित लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बारामतीच्या जनतेने खूप कष्ट करून हा मतदार संघ विकसित केला आहे. त्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघ हवासा वाटणे यात काही गैर नाही कारण प्रत्येकाला चांगलीच गोष्ट हवी असते, असे सुप्रिया म्हणाल्या.

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डाजी एका भाषणात म्हणाले होते की, एक देश एक पक्ष.. पण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. संविधानावर माझा विश्वास असल्याने एक देश, अनेक पक्ष, असे माझे विचार आहेत. त्यामुळे मी भाजप नेत्यांचे मनापासून बारामतीत स्वागत करते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पैसे, ईडी याद्वारे सत्ता ओरबाडून घेतली. सत्तेच्या माध्यमातून खरंतर सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा होती. मात्र मागच्या अडीच महिन्यात या सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. राज्यात अडीच महिन्यांपासून कोणत्याही जिल्ह्याला पाकलमंत्री मिळालेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी नवीन सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ मागितला असता त्यांच्याकडून वेळ मिळत नाही, असाही घणाघात राज्य सरकारवर केला.

हेही वाचा :

ब्रेकिंग : थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान, आजपासून आचारसंहिता लागू

रेशन कार्ड धारकांची संख्या कमी करण्यास विरोध – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

एकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये जोरदार राडा !

मेगा बजेट 500 कोटींचा चित्रपट पी एस 1चा ट्रेलर लाँच !

मॅक्स महाराष्ट्र (Max Maharashtra) चॅनेल युट्यूबने केला बंद, संपादकाची भावनिक पोस्ट

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय