Thursday, October 10, 2024
HomeNewsएकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये...

एकाच महिला पोलीसाच्या प्रेमात पडले 2 पोलीस कर्मचारी ; पोलीस स्टेशन मध्ये जोरदार राडा !

उत्तर प्रदेश : बरेलीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका महिला पोलीस शिपाईवर दोघांचे प्रेम जडले. पण दोघांची एकच प्रेमिका आहे असे कळल्यानंतर दोघे एकमेकांच्या जीवावर उठले
एकाच महिला पोलीस शिपाईवर दोघे प्रेम करत होते. पण हे प्रकरण इतक्यावर थांबले नाही तर ते दोघेही एकमेकांना जीवे मारायला ही आतूर झालेले दिसले.

बहेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे योगेश आणि मोनू हे दोघेही एकाच पोलीस महिला शिपाईवर प्रेम करत होते. सोमवारी रात्री दोघांमध्येही मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की एकाने पोलीस स्टेशनमध्ये सर्व्हिस रिवॉल्वरने हवेत फायरिंग केली.

ज्या क्षणाला ही घटना घडली त्या वेळेस अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ज्यांनी योगेश आणि मोनूला समजावून शांत केले सोबतच पोलीस स्टेशनमध्ये सर्विस रिवाल्वरने हवेत फायरिंग झोलेला मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला. पण एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांना या प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यांनी एसपी क्राईम मुकेश प्रताप सिंह यांना घटनास्थळी पाठवून चौकशी करायला सांगितली. पोलीस स्टेशनला पोहचताच एसपी क्राइम मुकेश प्रताप सिंह याच्यांसमोर सगळं प्रकरण उघडे झाले.

संबंधित लेख

लोकप्रिय