Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याNarendra Modi यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क

Narendra Modi यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तिसऱ्यांदा तर राहुल गांधी हे रायबरेतून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दाखल केल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार मोदींकडे सध्या ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वत:चे घर नाही, त्यांच्याकडे गाडीही नाही. पंतप्रधानांकडे एकूण 52,920 रुपये रोख आहेत. स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत 73,304 रुपये आहेत, तर एसबीआयच्या वाराणसी शाखेत केवळ ७००० हजार रुपये आहेत. पीएम मोदींची स्टेट बँकेत 2,85,60,338 कोटी रुपयांची एफडीही आहे.

पीएम मोदींनी त्यांच्या गेल्या 5 वर्षांच्या उत्पन्नाचा तपशीलही दिला आहे. 2018-19 मध्ये त्यांचे उत्पन्न 11,14,230 रुपये होते, 2019-20 मध्ये 17,20,760 रुपये, 2020-21 मध्ये 17,07,930 रुपये, 2021-22 मध्ये 15,41,870 रुपये आणि पंतप्रधानांनी 2022-23 मध्ये 23,56,080 रुपये उत्पन्न होते.

पंतप्रधान मोदींकडे 52,920 रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यांच्याकडे 2.7 लाखांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. याशिवाय शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड असे काहीही त्यांच्याकडे नाही.

Narendra Modi यांची शैक्षणिक पात्रता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास मोदी यांनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी केले होते. 1978 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. तर 1983 मध्ये पीएम मोदींनी गुजरात विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात

ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय