Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याNavneet rana : खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी

Navneet rana : खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी

Navneet rana : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. राणा यांच्या नोकरानेच चोरी केल्याची माहिती मिळत आहे. राणा यांच्या घरातून दोन लाखाची कॅश लंपास करण्यात आली आहे. पैसे घेऊन तो त्याच्या मुळगावी बिहारला पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत खार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांचे मुंबईतल्या खार येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अर्जून मुखिया हा घरगडी म्हणून काम करत होता. गेल्या दहा महिन्या पासून तो याच फ्लॅटवर राहात होता. तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. दिवसभर काम करुन तो तिथे राहत होता. याच घरात नोकराने चोरी केली आहे. या चोरीत दोन लाखांची कॅश चोरी करुन त्याने पलायन केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. अर्जुन मुखिया असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Navneet rana यांच्या घरून दोन लाख चोरी

फेब्रुवारी महिन्यांत घरखर्चासाठी रवी राणा (ravi rana) यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवली होती. त्यांनी घरखर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले होते. यावेळी कपाटात दोन लाख रुपये नव्हते. संपूर्ण कपाटाची पाहणी करुनही त्यांना कुठेच पैसे मिळाले नव्हते. ही चोरी अर्जून यानेच केली असल्याचा संशय आहे.

अर्जून मुखिया चोरी करून तो त्याच्या बिहारमधील दरभंगा या गावी पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम तयार करण्यात आली आहे. ही टिम तिथे जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क

मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात

ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय