पिंपरी चिंचवड : नुकत्याच मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग दुर्घटना झाली त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, हि खूप दुख:द व गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे हि घटना घडली आहे. pcmc news
अशाच प्रकारे 17 एप्रिल 2023 मध्ये पिंपरी चिंचवड हद्दीतील रावेत परिसरात किवळेमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून 5 जणांचा मृत्यू झाला होता. अशी माहिती नाना काटे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.
त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उदा. सर्व्हिस रोड, भाजी मंडई, बस स्टॉप, उंच इमारती आदी ठिकाणी पिंपरी चिंचवड (pcmc) शहरात अनेक अधिकृत व अनधिकृत होर्डिंग आहेत, पावसाळा देखील काही दिवसांवर आला असून या पावसाळ्याच्या दिवसात वादळ व मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशातच काही होर्डिंगमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व होर्डिंगचे सुरक्षेचा दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडीट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे. pcmc


हेही वाचा :
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क
मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात