मुंबई, (दि. १४) : ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.
ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास ४७२.१९ कोटी खर्च अपेक्षित आहे.
महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.
सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत
सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : शिवप्रेमींसाठी खूशखबर ; राज्यात ‘या’ सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार
1 लाख रूपयाची लाच घेणार्या लाचखोर वरिष्ठ लिपिकास अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले
शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती
राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान
खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ
ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल
खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी
शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?
गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध
भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार
बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
नोकरीच्या बातम्या वाचा :
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती