Friday, May 10, 2024
Homeजुन्नरजुन्नर विधानसभेची जागा कोण लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

जुन्नर विधानसभेची जागा कोण लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

जुन्नर : जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी जुन्नरमध्ये माझा शब्द डावलला जात नाही. त्यामुळे अतुल बेनके यांना तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी योग्य तो सल्ला दिला असल्याचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Who will contest Junnar assembly seat? Sharad Pawar made a big revelation

आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहोत. यामध्ये जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो असेही पवार म्हणाले.

जुन्नर तालुक्यात आदिवासी चौथरा अभिवादन दिनानिमित्त मेळाव्यासाठी आज रविवारी आले. जन्नर येथील सभेपूर्वी विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय