Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुनावळे येथे पावसामुळे रस्त्याची चाळण; तातडीने दुरुस्त करण्याची राजू पेठे यांची मागणी

पुनावळे येथे पावसामुळे रस्त्याची चाळण; तातडीने दुरुस्त करण्याची राजू पेठे यांची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पुनावळे कोयते चौक आणि काटे वस्ती येथील रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली असून येथे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचले आहे, रस्ता निसरडा झाल्याने हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे वाहन चालक घसरुन पडत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी राजू पेठे यांनी आयुक्तांकडे केली आहे. Road washed out due to rain in Punawale; Raju Pethe’s demand for immediate correction

या परिसरात विविध हौसिंग सोसायट्या मधील नागरिक, महिला, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसात रस्त्याची चाळण झाली आहे.

‘ड’ प्रभाग प्रशासनास रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजू पेठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय