Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्वच्छता मोहिमेत तृतीयपंथीय व महिलांसह अनेक मान्यवरांचा सहभाग

PCMC : स्वच्छता मोहिमेत तृतीयपंथीय व महिलांसह अनेक मान्यवरांचा सहभाग

मानवता हिताय सोशल फौंडेशनचा उपक्रमात सहभाग 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महात्मा गांधी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे 1ऑक्टोबर रोजी “स्वच्छता प्रीमियर लीग” अंतर्गत मानवता हिताय सोशल फाउंडेशन व प्रतिभा नारी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.‌ Participation of many dignitaries including third parties and women in the cleanliness campaign

शहरातील अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी ह्या उपक्रमात सहभाग नोंदवताना तृतीयपंथीयाना सहभागी करून घेतले. 

स्वछता ही शिस्त नसून शहराच्या समाजाच्या सौंदर्यीकरणासाठी निरंतर सहकार्य असावा, याकरिता महिला, मुला मुलीसह सर्वांनी स्वच्छतेसाठी शपथ घेतली.

संस्थेच्या तृतीयपंथी शहराध्यक्षा गायत्री थेरगावकर व सर्व तृतीयपंथी सदस्य तसेच महिला शहराध्यक्षा रजीना फ्रँसीस, वैशाली मिडगुले, फिरदोस शेख, माधुरी रुबदी व ईतर सर्व महिला सभासद उपस्थित यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय