Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भाजपच्या शहर सचिव पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती 

PCMC : भाजपच्या शहर सचिव पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या आध्यक्षतेखाली भाजपा पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात जनसेवक युवानेते मधुकर बच्चे यांची भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. Appointment of Madhukar Bachche as city secretary of BJP

मागील अनेक वर्षाापासून ते पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजिककार्य करित आहेत, या आधी त्यांनी पक्षात अनेक पदावर कामे करून त्या पदाना साजेशी सामाजिक व नागरी समस्यांचे निवारण केले आहे.

पक्षाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य या शासकीय पदावर कार्यरत आहेत, नागरिकांच्या महावितरण संबंधी तक्रारींचा निपटारा ते सतत करत असतात. शहरातील सेवाभावी संस्थाच्या उपक्रमात अन्नधान्य, औषधे, कपडे ईई गोरगरिबांच्या गरजेच्या वस्तू त्यांनी दान केल्या आहेत.

पक्षाने दिलेल्या नवीन जबाबदारीला साजेशे काम करण्याचा प्रयत्न करीन, या पदाचा पक्षाला व जनतेला जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा मी प्रयत्न करीन.असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल पिंपरी चिंचवड व परिसरातील नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेक्स मेसेज, फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय