Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याST Bus : लालपरीचा प्रवास महागणार! तब्बल 'इतक्या' वाढीची शक्यता

ST Bus : लालपरीचा प्रवास महागणार! तब्बल ‘इतक्या’ वाढीची शक्यता

ST Bus : सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तिकीट दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली येत आहे.

ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून एप्रिल ते १५ जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार असल्याचेही समजते. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य परिवहन (ST Bus) प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

उन्हाळी सुट्टीत मूळ गावी, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. शालेय विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. 10 एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यात एसटी धावते. सध्या 13 हजार एसटीच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची जास्त गर्दी होते. एसटीच्या प्रवासाला नागरिक प्राधान्य देतात. या प्रवासी गर्दीतून महसूल वाढीसाठी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय