Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar : कल्याण-नगर महामार्गावर तिहेरी अपघात

Junnar : कल्याण-नगर महामार्गावर तिहेरी अपघात

Junnar: डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील कल्याण – नगर महामार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी (दि.१४) दुपारी अडीचच्या सुमारास ३ वाहनांचा अपघात झाला. यात टेंपोचालक जखमी झाला असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Junnar)

सविस्तर वृत्त असे की, आळेफाट्याच्या दिशेकडून ओतूरकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ (एमएच १४ इवाय ८४२६) ला ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणार्‍या कार (एमएच १४ बीएक्स ८००८) ची धडक झाली. त्यानंतर कार टेंपो (एमएच १४ डीएम ९००८) ला धडकला. यात टेंपोचालक सुरेश तुकाराम शिंदे (रा. आळे, ता. जुन्नर) हे जखमी झाले. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघाताचे कारण समजू शकले नाही.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर, पोलीस हवालदार विलास कोंढावळे हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय