Saturday, April 27, 2024
Homeराज्यवीजबिल तक्रारी संदर्भात उच्चदाब वीजग्राहकांसाठी पुणे प्रादेशिक कार्यालयात विशेष मदत कक्ष

वीजबिल तक्रारी संदर्भात उच्चदाब वीजग्राहकांसाठी पुणे प्रादेशिक कार्यालयात विशेष मदत कक्ष

पुणे : प्रामुख्याने औद्योगिक ग्राहकांसह सर्व उच्चदाब वीजग्राहकांसाठी वीजसेवेबाबत सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या मदत कक्षाकडे [email protected] या इमेलद्वारे उच्चदाब वीजग्राहकांना संपर्क साधता येईल व तक्रारी देेखील दाखल करता येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील औद्योगिकसह सर्व उच्चदाब वीजग्राहकांच्या वीजपुरवठा, वीजबील, नवीन वीजजोडणी, वीजभार बदल आदींबाबतच्या तक्रारींची त्वरीत दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे हे प्राप्त झालेल्या तक्रारीं व त्याचे निराकरण याबाबत नियमित आढावा घेणार आहेत. 

उच्चदाब वीजग्राहकांनी वीजसेवा, बिलिंगबाबत तक्रारी असल्यास [email protected] या इमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय