Saturday, April 20, 2024
Homeराज्यनगर मनमाड रस्त्यावर ९४ लाखाची अवैध दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

नगर मनमाड रस्त्यावर ९४ लाखाची अवैध दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

नाशिक : जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोहीमेत गुरुवारी नगर मनमाड महामार्गावर पिंपळगाव जलाल परिसरात ९४ लाखाची अवैध दारू जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.

विभागाला नगर मनमाड रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे माहिती मिळताच विभागाने येवला टोल नाक्याजवळ येणाऱ्या गाड्याची तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीत नंदुरबारच्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

हा माल दहा चाकी (एमएच  ०४ डीएस २९२८) ट्रक मधून दोन व्यक्ती घेऊन जात होत्या. यामध्ये ११ प्रकारच्या दारू आढळून आल्या. ९३ लाख ३६ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. ही कारवाई येवला, मालेगाव, सटाणा, कोपरगाव, नाशिक भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली. विभागीय पथकाचे निरीक्षक फुलझळई अधिक तपास करीत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय