औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ च्या मुख्य गेट समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले
1 जून 2023 रोजी नांदेड जवळ बोंढार हवेली या ठिकाणी भीमजयंतीची मिरवणूक काढली म्हणुन गावातीलच स्वतःला सवर्ण समजणाऱ्या मस्तवाल जातीवाद्यांनी अक्षय भालेराव या तरुणाचा भोसकून खून केला.
नामांतराच्या लढ्यापासून, आज पर्यंत सडक्या जातीवादी मानसिकतेतून अनेक उमद्या आंबेडकरवादी तरुणांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय, या घटनेला जेवढे मस्तवाल मुजोर जातीयवादी हत्यारे जबाबदार आहेत तेवढेच जातीयता आणि धर्मांधतेला प्रोत्साहन देणारे राज्यकर्तेही जबाबदार आहेत. या मुळेच जातीयवादी लोकांना बळ मिळते. आरोपींना कठोर करत शिक्षा करण्यात यावी ही मागणी एस एफएसआय ने केली आहे.
या वेळी अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड, माजी नेत्या सुनीता लोंढे, माजी जिल्हा अध्यक्ष डॉ.लोकेश कांबळे, SFI चे जिल्हा सचिव अशोक शेरकर, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बल्लाळ, विश्वजीत काळे, प्रतीक बोर्डे, मुनिर सय्यद, विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते, सचिव अनुजा सावरकर, कृष्णा रकटे, सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रशांत बोराडे, संदीप तुपसमुद्रे, बळीराम चव्हाण, भागवत चोपडे, दिनेश भवाले, आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर
PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या
राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!
दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी