Sunday, April 28, 2024
Homeराजकारणअक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश...

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

अकोला : नांदेड येथील बोंढार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “नांदेड येथील बोंढार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे. दोषींवर ॲट्रोसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. अक्षय हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समुहासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत !”

अक्षयच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्षय आणि आकाश सायंकाळी गावातील एका किराणा दुकानात गेले असता काही लोकांनी अक्षयवर जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला. ही मंडळी मुख्य रस्त्यावरून निघालेल्या मराठा वऱ्हाडींच्या मिरवणुकीत सहभागी होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरडाओरडा आणि डीजे म्युझिकवर नाचण्यासोबतच वरातीत सहभागी काही लोक तलवारी, काठ्या आणि खंजीरही नाचवत होते.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच, वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे म्हटले आहे.

 हे ही वाचा :

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय