Sunday, May 12, 2024
Homeराज्यLIC ने बालासोर दुर्घटनेतील पिडीतांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती

LIC ने बालासोर दुर्घटनेतील पिडीतांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री जाहीर केले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी क्लेम सेटलमेंटला गती आणली जाईल.

दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे एलआयसीच्या निवेदनात म्हटले आहे. पुढील सहाय्यासाठी, दावेदार त्यांच्या जवळच्या शाखा, मंडळ किंवा ग्राहक क्षेत्राशी संपर्क साधू शकतात, असे एलआयसीने सांगितले. त्यात पुढे म्हटले आहे की, ‘दावेकर्ते आमच्या कॉल सेंटर-02268276827 वर देखील कॉल करू शकतात.’

एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्रांच्या बदल्यात, रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल.

 हे ही वाचा :

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय