Saturday, April 27, 2024
Homeराजकारणमहिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

बीड : महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून देशभरात केंद्र सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. असे असताना केंद्र सरकार खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्यावर कारवाई करत नाही. यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यात आता भाजपाच्या महिला खासदारानी मोदी सरकारलाच घराचा आहेर दिला आहे.

खा. प्रीतम मुंडे या बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यावेळी महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना म्हणाल्या, ‘केवळ खासदारच नाही तर, एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी’ असे खा. मुंडे म्हणाल्या.

एका भाजप खासदाराने सरकार विरोधात भूमिका मांडल्यामुळे त्याची चर्चा होत आहे. कुस्तीपटूंना विविध स्तरांतून दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.

हे ही वाचा :

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय