Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम. जोशी कॉलेजमध्ये 'महिलांसाठी विविध कायदे' या विषयावर मार्गदर्शन

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये ‘महिलांसाठी विविध कायदे’ या विषयावर मार्गदर्शन

हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी महाविद्यालयातील हॉस्टेल मधील मुलींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, ए.पी.आय. सुवर्णा गोसावी, पी.एस.आय. सारिका जगताप आणि दामिनी पथकाच्या वैशाली उदमले उपस्थित होत्या.

विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांची व शिक्षकांची मान उंचावेल अशा स्वरूपाचे कार्य केले पाहिजे. मुलींनी चांगल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे. तसेच कोणते तरी ध्येय ठेवून सामाजिक कार्य केले पाहिजे. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी केले.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ए.पी.आय. सुवर्णा गोसावी म्हणाल्या की, मुलींनी स्वतःला कोणत्याही प्रकारे कमकुवत समजू नये. कारण महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता चांगले कार्य केले पाहिजे. मुलींनी कॉलेज जीवनात विशिष्ट प्रकारचे ध्येय ठेवून अभ्यास केला पाहिजे. मुलींनी फेसबुक, इन्स्ट्रग्राम या सोशल मीडियावर स्वतःची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. बरेचसे कायदे महिलांच्या बाजूने असतात म्हणून महिलांनी घाबरून न जाता कायद्याचे शस्त्र वेळोवेळी वापरावे. असे मत व्यक्त केले.

पी.एस.आय. सारिका जगताप म्हणाल्या की, मुलींनी स्टेज डेरिंग वाढवायला पाहिजे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पलाइन नंबर स्वतःजवळ ठेवायला पाहिजेत. त्यामुळे आपणास कोणत्याही वेळी अडचण आली तरी आपण तत्काळ मदतीसाठी आवाज देऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

पाहुण्यांचे स्वागत व सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार हॉस्टेल रेक्टर प्रा.रेखा कराड यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. शिल्पा शितोळे आणि वसतिगृहातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

हे ही वाचा :

व्हिडीओ : भारताच्या हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘या’ सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय