Friday, March 29, 2024
Homeकृषीसीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !

पुणे : सीताफळ काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवार (ता. २८) पासून सीताफळाची आवक सुरू झाली आहे.पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये वडकी (ता. हवेली) येथील शशिकांत पांडुरंग फाटे यांनी विक्रीसाठी आणलेल्या सीताफळाला प्रति किलो ३६० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

गुलटेकडी मार्केटमध्ये सीताफळाची पुणे परिसरातील पुरंदर, वडकी या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते. या भागांत शेकडो हेक्टरवर सीताफळाच्या फळबागा आहेत. यंदा वडकी येथील श्री. फाटे यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले होते. त्यानुसार पहिली तोडणी शनिवारी (ता. २७) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे मार्केटमध्ये फळ व्यापारी युवराज काची यांच्याकडे विक्रीसाठी आणला होता.

मार्केटमध्ये सीताफळाची प्रतवारी करून दोन कॅरेट आणले होते. एका कॅरेटमध्ये एक नंबरचा १५ किलो, तर दुसऱ्या कॅरेटमध्ये दोन नंबरचा ९ किलो असा एकूण २४ किलो माल विक्रीसाठी आणला होता. मार्केटमध्ये एक नंबरच्या मालाला प्रति किलो ३६० रुपयांचा दर मिळाला. तर दोन नंबरच्या मालाला प्रति किलो १०० रुपयांचा दर मिळाला आहे. येत्या काळात मार्केटमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय