Wednesday, May 8, 2024
Homeराज्यहजारोंना दृष्टी देणाऱ्या पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे…

हजारोंना दृष्टी देणाऱ्या पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांचे तडकाफडकी राजीनामे…

मुंबई : जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. रागिनी पारेख आणि वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या दबावामुळं त्यांनी राजीनामे दिल्याचं बोलले जात आहे.

एबीपीच्या माहितीनुसार, मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकित्सा विभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण त्यानेही समाधान झाले नसल्याने मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे आणि मार्डच्या डॉक्टरांचा संप यामुळं आता जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग बंड पडण्याच्या मार्गावर आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच रुग्णालयात जॉईन झालेल्या निवासी डॉक्टरांच्या या दबावामुळं डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्डकडून लहाने यांच्यावर दबाव वाढत होता. यासंबंधी तक्रारींची चौकशी देखील झाली पण यामध्ये काहीही निष्पण्ण झालं नसल्याचं विभागानं स्पष्ट केलं होतं. विभागप्रमुख रागिनी पारीख यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.

हे ही वाचा :

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय