Sunday, April 28, 2024
Homeराजकारणमहाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?' असा सवाल करत...

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

नांदेड (दि.2) : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घटली आहे. ‘गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल विचारत एका दलित तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

‘गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल विचारत नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील दलित तरुण अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) (वय २३) याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी दलित वस्तीवर जाऊन घरांवर दगडफेक केली. मृताची आई व अन्य नातेवाईक सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. घटनेनंतर अक्षयला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला. अक्षय भालेराव याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्नाच्या वरातीत 1 जून रोजी हा प्रकार घडला.

अक्षयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार निवारण) कायदा 3(1)(आर), 3(1)(एस) आणि 3(2)(वीए) आणि धारा 143, 147 आणि भारतीय दंड संहिता कलम 148, 149, 302, 307, 324, 323, 294 आणि 504 तसेच शस्त्रास्त्र कायद्याची धारा 4, 25 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अक्षयच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्षय आणि आकाश सायंकाळी गावातील एका किराणा दुकानात गेले असता काही लोकांनी अक्षयवर जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला. ही मंडळी मुख्य रस्त्यावरून निघालेल्या मराठा वऱ्हाडींच्या मिरवणुकीत सहभागी होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरडाओरडा आणि डीजे म्युझिकवर नाचण्यासोबतच वरातीत सहभागी काही लोक तलवारी, काठ्या आणि खंजीरही नाचवत होते.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच, वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे म्हटले आहे.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय