Friday, April 26, 2024
Homeजिल्हाभाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणे घरणेशाहीत अडकलेला पक्ष – गोपाल...

भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणे घरणेशाहीत अडकलेला पक्ष – गोपाल इटालिया

पुणे : “ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ठेकेदार बनायचं आहे ते लोक भाजपमध्ये जातात. ज्यांना केवळ पद हवय ते लोक काँग्रेसमध्ये जातात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे देशाची सेवा करायची ते लोक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बनतात. जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते”, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांनी काल पुण्यात झालेल्या स्वराज्य सभेमध्ये व्यक्त केले.

“पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात शहराचे वाटोळे केले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला. नागरिकांचे कोणतेही प्रश्न सुटण्यास भाजपच्या राजवटीचा फायदा झाला नाही. पुणेकर नागरिक येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा जाब विचारतील. कसब्यापासून सुरू झालेले भाजप विरोधी वातावरण संपूर्ण पुण्यात पसरेल”, असे मत पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केले.

काल पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा रॅली व जाहीर सभा पार पडली. आझम कॅम्पस येथून सुरू झालेली ही रॅली पावर हाऊस, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता मार्गे हिराबाग चौकात आली आणि हिराबाग चौक येथे जाहीर सभा पार पडली. या यात्रेचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव व राज्य सहप्रभारी गोपाल इटालीया आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले. यावेळी मंचावर मुकुंद कीर्दत, संदीप देसाई, संदीप सोनवणे, सुनीता काळे हे उपस्थित होते. अभिजीत गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्रामध्ये स्वराज्य यात्रेची सुरुवात 28 मे रोजी भक्ती स्थळ पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी शक्तिस्थळ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे.

स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहचत आहे. दिल्ली, पंजाब, गोवा व गुजरात येथे मिळालेल्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे पक्ष स्थापनेच्या एका दशकातच आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पार्टी बनली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील राज्य समिती व विभागीय समित्या बरखास्त करून संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली आहे. पुण्यामध्ये स्वराज यात्रेचे स्वागत सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, आम आदमी पार्टी रिक्षा संघटना, कंत्राटी कामगार सफाई कामगार तसेच अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल भाई इटालिया यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

दिल्ली व पंजाब या ठिकाणी नागरिकांना मोफत वीज, मोफत पाणी, महिलांना मोफत बस प्रवास, मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत अद्यावत हॉस्पिटल्स, व्यापाऱ्यांसाठी घेतलेले हिताचे निर्णय, ज्येष्ठांसाठी मोफत तीर्थयात्रा, सर्व शहरांमध्ये जागोजागी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे, घरपोच सुविधा देणाऱ्या एकमेव राज्य अशा एक ना अनेक कामे करून आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरात त्यानंतर महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. पुण्यामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आपलं वर्चस्व सिद्ध करेल असे या ठिकाणी सांगण्यात आले.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय