Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर "हा" विभाग सर्वात कमी

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SCC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

दहावीचा निकालाची वैशिष्ट्ये

* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25
* दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.
* राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण.
* 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
* यावर्षी दहावीचा निकाल 93.83 , मागीलवर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.
* 2020 मधील निकालाशी तुलना करता यावर्षीचा निकाल 1.47 टक्के.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय