Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हामराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध – DYFI 

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध – DYFI 

परळी : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया परळी तालुका कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या संबंधीचे निवेदन सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप दहिफळे यांना देण्यात आला आहे. Protest against lathi attack on protestors for the demands of Maratha community – DYFI

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे या गावात संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. प्रश्न सोडवून घेण्यासाठी आंदोलने करणे हा लोकशाहीमध्ये अधिकार असतो. या ठिकाणी जे आंदोलन शांततेत चालू असताना कुठलाही कायदा हातात घेतलेला नसताना पोलीस बळाचा वापर करणं हे योग्य नाही.

त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आपल्या मागण्यांसाठी शेतकरी, विद्यार्थी, युवक, कामगारांचे आंदोलने देखील मोडून टाकण्याचा डाव ही शासन व्यवस्था करत आहे, असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी विशाल देशमुख, प्रकाश उजगरे, विजय घुगे, मुंजा नवगरे, सिद्राम सोळंके, बाबा शेरकर, मदन वाघमारे, अशोक जाधव, प्रवीण देशमुख, विष्णुपंत देशमुख, देविदास कांबळे, पंडित शिंदे, राहुल काशीद, मदन राठोड, बिभिषण भिसे, प्रशांत कोकाटे, बबन देशमुख आदी युवक उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय