नांदेड : जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी अंदोलन सुरू असतांना अंदोलनकर्त्यावर पोलीस प्रशासनाकडून अचानक लाठीमार करण्यात आला. लोकशाही मध्ये न्याय मागण्यासाठी सनदशिर मार्गाने अंदोलन करण्याचा अधिकार असतांना एकीकडे वाटाघाटीचे नाटक करायचे व अचानक लाठीहल्ला करायचा ही बाब अत्यंत खेदजनक आहे. प्रागतिक पक्ष नांदेडच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करीत आहोत, असे निवेदन प्रागतिक पक्ष नांदेड च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. Protest against the caning of protesters for Maratha reservation – progressive Party
निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणा संदर्भात राज्यशासनाने सहानुभूतीपुर्वक तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अमानुषपणे लाठीहल्ला करणाऱ्यावर प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी. अंदोलकावर दाखल झालेले गंभीर गुन्हे झालेले तात्काळ माघे घ्यावे. केंद्र शासन व राज्यशासना कडून सुरू असलेले खाजगीकरण व कंत्राटीकरण्याचे धोरण रद्द करून सामाजिक न्याय व समता प्रस्तापित करण्यासाठी अरक्षणाचे धोरण प्रभावीपणे राबवावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी ॲड. प्रदिप नागापूरकर, कॉ. विजय गाभणे, कॉ. उज्वला पडलवार, सुर्यकांत वाणी, प्रो. डॉ. लक्ष्मण शिंदे, दिगंबर घायाळे, मारूती घोरपडे, पल्लवी रावते, प्रफुल्ल कउडकर आदींसह उपस्थित होते.