Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन

PCMC : केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.२७ – आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले. PCMC News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन ईडीने केलेली अटक हा लोकशाहीवरील व भारतीय संविधानावरील खूप मोठा हल्ला आहे. देशातील विरोधी पक्षांना संपवण्याचे मोदी शहा यांचे हे षडयंत्र आहे. याचा सर्व देशभर निषेध होत आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आणि महायुतीचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सूडबुद्धीने इंडिया आघाडीतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यातूनच केजरीवालांना अटक, काँग्रेसची बँक खाती गोठवून इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या विजयापासून रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा करत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन घेतल्याचे इंडिया आघाडी चे पिंपरी चिंचवड (PCMC) समन्वयक मानव कांबळे यांनी संगितले.

या वेळी इंडिया आघाडीतील मानव कांबळे – समन्वयक, आमदार गौतम चाबुकस्वार, कैलास कदम -राष्ट्रीय काँग्रेस, तुषार कामठे -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, सचिन भोसले- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, मीना जावळे -आम आदमी पार्टी, कॉम्रेड गणेश दराडे- माकप, कॉम्रेड अनिल रोहम-भाकप, बी डी यादव -समाजवादी पक्ष, अपना वतन संघटना : सिद्धिक शेख, संभाजी ब्रिगेडच्या प्रविण कदम, मराठा सेवा संघ आदी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय