Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : लाखो भाविकांच्या नाम जयघोषात, तुकाराम महाराज बीज सोहळा 

PCMC : लाखो भाविकांच्या नाम जयघोषात, तुकाराम महाराज बीज सोहळा 

PCMC : देहू नगरीत लाखो भाविक संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शनास 

आळंदी – देहू / अर्जुन मेदनकर  : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा त्रिशत्कोत्तरअमृत महोत्सव बीज सोहळा बुधवारी ( दि. २७ ) हरिनाम गजरात देहुत पार पडला. PCMC

सोहळ्यास राज्यभरातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ || असं म्हणत जगाला समता शांतीचा आणि विवेकाचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याच आख्यायिकेस अनुसरून तुकाराम बीज सोहळा परंपरेने साजरा करण्यात आला.

सोहळ्यात पहाटे ३ वाजता काकाडा आरती, पहाटे ४ वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांना महापुजा अध्यक्ष व विक्ष्वस्त यांचे हस्ते श्री संत तुकाराम महाराज महापुजा झाली. पवमान अभिषेक झाल्यानंतर, सकाळी १० ते १२ दरम्यान ह. भ. प. बापू महाराज देहुकर यांची किर्तन सेवा झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान झाले. वैकुंठ मंदिरात आरती, प्रदक्षिणा घालून नांदुरकीच्या वृक्षाजवळ जमलेले लाखो वारकरी भाविकांनी एकाच वेळी पुष्पवृष्टिने सोहळा पार पडला. PCMC NEWS

सोहळ्यासाठी आलेले वारकरी दिवसभर पालखी दर्शन, तुकारामांच्या पादुकांचे दर्शन त्याचबरोबर किर्तन भजनाचा आनंद घेत महाप्रसाद झाला.बीज सोहळा हा वारकऱ्यांचा अत्यंत मानाचा मानला जातो. कारण वारकरी पंथाचे कळस तुकोबा आहेत.

एका अभंगात तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटलंय. हे पाहता तुकोबांच्या बीजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बापु महाराज देहुकर किर्तन सांगता होते त्याच बरोबर देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील पाहण्यास मिळतो. इथे नांदुरकी नावाचे वृक्ष आहे.त्याचे दर्शन भक्तगणांनी घेतले.

संत तुकाराम महाराज बीज साठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. या  महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे बीज सोहळ्यास उपस्थित होते. निगडी तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रविण ढमाले, देहू नगरपंचायत  मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, खासदार श्रीरंग बारणे, शाहुनगर नगरसेवक नारायण बहिरवडे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रविण काळोखे,योगेश परंडवाल, मयुर शिवशरण, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, देहू नगरपंचायतीचे नागसेवक (PCMC NEWS) पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतचे आजी, माजी सरपंच, देहूकर नागरिक भाविक उपस्थित होते.

राज्यातील विविध भागातील दिंड्या दिंड्यातून आलेल्या भाविकांनी देहूत हरीण गजर करीत देहू नगरी भाविकांचे नाम जय घोषणे दुमदुमली. देहू मंदिर, गाथा मंदिर, इंद्रायणी नदी घाट आणि गाथा मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर भाविकांचे गर्दीने फुलला होता. सारे भाविक सोहळ्यात सहभागी झाली.

भाविकांच्या स्वागतासह सुरक्षिततेसाठी  पोलीस आणि देहू नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा, जंतुनाशके फवारणी, पी.  ए.सी. यंत्रणा ई सर्व सुविधा दिल्या.

बीज सोहळ्याचे प्रशासकीय नियोजन प्रांत हवेली संजय असवले, तहसीलदार जयराम देशमुख, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, देहू देवस्थानचे वतीने संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी प्रभावी नियोजन करून भाविकांना सुलभ दर्शनासह सर्व सेवा  दिल्या. PCMC

तुकाराम  बीज  महोत्सवात देहू येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व पोलिस मित्र वेल्फेअर असोशिएशन ऑफ इंडियाच्या तर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात पोलीस मित्रानी सेवा रुजू केली. PCMC NEWS

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी, सहाय्यक पोलिस आयुक्त कसबे=, पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, पोलिस उपनिरीक्षक जमदाडे, पोलीस मित्र वेल्फेअरचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र जाधव, कमांडर किरण कोल्हे, सचिन घोंगडे, संदिप चोपडे, निलेश कापडणे, करण कव्हळे, सुरज शिंदे, कैवल्य टोंपे इतर पोलिस अधिकारी व कमांडर यांनी परिश्रम घेतले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय