Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

PCMC : महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. ११ एप्रिल २०२४ :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे उत्तम लेखक, थोर समाजसुधारक, तत्वज्ञ आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांनी या देशासाठी, समाजासाठी केलेले कार्य महान असून त्यांच्या या कार्याचा जागर व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रबोधन पर्वास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवांच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (pcmc) वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले  जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव  फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव  फुले (mahatma fule) यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. pcmc news

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनपर्वाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. pcmc news

यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, विनय ओहोळ, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे तसेच महापालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्व उपक्रम तसेच कार्यक्रम पार पाडायचे आहेत. यासाठी महापालिकेस सर्व उपस्थित कलाकारांचे तसेच नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

गुरूवारी शाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या  गाथा महापुरुषांची या महामानवांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांच्या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ झाला. सकाळी उषा कांबळे  यांचा  महात्मा जोतीराव  फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग पार पडला. तर दुपारी मधुकर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपारिक संगीत वाद्यातून महापुरुषांना अभिवादन केले आणि मतदान जनजागृती कार्यक्रम सादर केला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मोहड यांचा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव  फुले लिखित अखंडावर आधारित स्वर फुलोरा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.  सायंकाळी धम्मा विंग्स, मुंबई प्रस्तुत जयभीम रॉक बॅण्ड या कार्यक्रमाद्वारे महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गायक अमित जाधव यांच्या सूर क्रांतीचा, आवाज महापुरुषांचा या संगीत-नृत्य-नाट्य-गीतांच्या अविष्काराने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता झाली. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय