Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याभाजप नेते चंद्रकांत पाटीलांच्या सभेतच शेतकऱ्यांचा गोंधळ

भाजप नेते चंद्रकांत पाटीलांच्या सभेतच शेतकऱ्यांचा गोंधळ

Chandrakant Patil : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभेच शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चालू बैठकीमध्येच एका शेतकऱ्याने माझे २२ लाखांचं नुकसान झाल्याचा दावा करत गोंधळ घातला.

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते. या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच टेंभुर्णी येथील शेतकरी संपतराव काळे यांनी आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवडीमध्ये २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हणत चंद्रकांत पाटीलांना जाब विचारला.

त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचा आवाहन करत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी धक्काबुकी करत शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. काही काळ तणाव निर्माण झाला होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय