पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : अनाम प्रेम या संस्थेच्या वतीने गुजरात सुरत येथे 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्त, चित्र, कला, नाटय स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या यामध्ये देशातील 22 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (PCMC)
या मध्ये चित्रकला, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे, मेमरी गेम, नाटक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये “अभिराज फॉउंडेशन “च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी “झाडे लावा झाडे जगवा “हे नाटक सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला यावेळी “अभिराज फाउंडेशन “ला उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त झाला. (PCMC)
तसेच स्पर्धेत तील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मध्ये रविकांत बालवडकर, आरुष धायगुडे, समर्थ शेटे, संतोष कोळी, शिवानंद मणिकरी, रोहन वैद्य, समृद्ध गायकवाड, गणेश ढोकळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते, तसेच स्पर्धेच्या वेळी विकास जगताप, धनंजय बालवडकर( पालक प्रतिनिधी)व अभिराज फाउंडेशनचे सल्लागार अभिजीत तांबे यांनी मार्गदर्शन केले होते. तर सहकार्य केले होते योगेश आढले, दीपक गाढवे, कुणाल गायकवाड यांनी या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिराज फाउंडेशनच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण व डायरेक्टर सौ. स्वाती अभिजीत तांबे व श्री रमेश आनंद मुसूडगे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा :
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य