Friday, December 6, 2024
Homeराज्यमोठी बातमी : माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

मोठी बातमी : माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

Nitin raut : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या कारचा बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. प्रचार सभा आटोपून घरी परतत असताना ऑटोमोटिव्ह चौकाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत सुदैवाने नितीन राऊत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या कारला मोठा फटका बसला आहे.

घटनेनंतर समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघातानंतर ट्रक चालकाविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची तपासणी सुरू केली असून, ट्रक चालकाने कारला धडक का दिली याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्यासमोर भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेके आणि अपक्ष अतुल खोब्रागडे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

Nitin raut

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय