Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPimpri Vidhan Sabha 2024 : जाती अंत संघर्ष समितीचा डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर...

Pimpri Vidhan Sabha 2024 : जाती अंत संघर्ष समितीचा डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना जाहीर पाठिंबा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाविकास आघाडीच्या पिंपरी विधानसभेच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना विविध पुरोगामी, धर्मनिरपेक्ष संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. जातीअंत संघर्ष समिती, पुणे या संघटनेनेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
(Pimpri Vidhan Sabha 2024)


जातीअंत संघर्ष समिती, पुणे

आपल्याला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. (Pimpri Vidhan Sabha 2024)

जातीअंत संघर्ष समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने, आम्ही आपल्याला या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देत आहोत. पिंपरी-चिंचवडच्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर आपण नेहमीच आवाज उठविला आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासंबधी अग्रक्रमाने पुढाकार घेतला आहे. मागासवर्गीयांच्या उन्नती व विकासासाठी आपण चांगले काम करित आहात.

आपण नेहमीच समाजसेवेचे ध्येय उराशी बाळगून कार्यरत आहात. आपल्या या संघर्षातील सहभागामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल अशी आम्हाला आशा आहे.

आम्ही जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करीत आहोत. पिंपरीच्या सर्वांगीण विकासासाठी, समतावादी विचारसरणीच्या वृद्धीसाठी आपल्याला संपूर्ण सहकार्य देण्यास आमची समिती सदैव तयार आहे.

आपणास आगामी निवडणुकीत विजयी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले,
अध्यक्ष – अ‍ॅड. विशाल जाधव
सचिव – डॉ. किशोर खिल्लारे
जातीअंत संघर्ष समिती, पुणे जिल्हा

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय