Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्यात शेकडो पालकांचा १००% मतदानाचा निर्धार

PCMC : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्यात शेकडो पालकांचा १००% मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आमच्या संस्थेत दिव्यांग विद्यार्थी उत्तमरित्या शिक्षण घेत असून त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे सांगून चिंचवड मूक बधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा तारु यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उपस्थित पालकांना येणा-या विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहनही केले. (PCMC)

सुहृद मंडळ पुणे, संचालित निगडी प्राधिकरण येथील आय.एस.ओ. मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित “चिंचवड बधिर मूक विद्यालय” येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे विद्यालय असून त्यामध्ये १ली ते १० वी चे १६९ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २० नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आज पार पडला. यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानूसार २०५, चिंचवड विधानसभा व २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. (PCMC)

यावेळी उपस्थितांनी “आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. या शपथेचे वाचन स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर दुभाषिक स्मिता घबाडे व अर्जुन मोरे यांनी सांकेतिक भाषेत शपथेचे अनुवादन केले.

मतदान जनजागृती कार्यक्रमास नोडल अधिकारी श्रीनिवास दांगट, शरद पाटील, प्रफुल्ल पुराणिक, राजीव घुले, विद्यालयाच्या उप प्राचार्या पल्लवी पिंपळे तसेच स्वीप व्यवस्थापनाचे दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे तसेच शेकडो पालक उपस्थित होते. (PCMC)

गेल्या अनेक दशकांपासून चिंचवड बधिर मूक विद्यालय कार्यरत असून आतापर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले असून या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पालकांची यादी संस्थेमध्ये आहे. येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनाही संस्थेच्या वतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती उमा तारु यांनी दिली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय