Monday, May 6, 2024
Homeजिल्हाNashik : राजू देसले यांचा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मान!

Nashik : राजू देसले यांचा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मान!

Nashik : गेल्या १० वर्षात भारतात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सातत्याने जनता विरोधी धोरण राबवले आहेत. भारतीय संविधान मूल्य तुडवली जात आहेत. जात, धर्म चे राजकारण मतासाठी केले जात आहे. विरोध करणाऱ्यांना जेल मध्ये टाकले जात आहे. शेतकरी, कामगार, कर्मचारी, आंदोलन मागण्याकडे दुर्लक्ष करत. त्यांना त्रास दिला जात आहे. देशात सत्तेसाठी भाजप काहीही करत आहे. त्यांचा पराभव करावा. व भारतीय संविधान व देश वाचवा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रतिपादन त्यांनी केले. Nashik

नाशिक लोकल वृत्तपत्र वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विशेषांक प्रकाशन कार्यक्रम लायन्स क्लब हॉल, जुनी पंडित कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार निरंजन टकले, सुरेश निकुभ, अशोक पांडे, सतीश रूपवते, अविनाश आहेर विचारमंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ने सामाजिक, राजकीय सांस्कृतिक, शेतकरी कामगार चळवळीत योगदान देणारे मान्यवर चा सन्मान स्मृति चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. Nashik

कॉ.राजू देसले भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव महाराष्ट्र, आयटक राज्य सचिव महाराष्ट्र , किसान सभा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र, आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्री परिचर, ग्राम रोजगार सेवक, शेतमजूर, घरकामगार मोलकरीण, कंत्राटी कामगार कर्मचारी, जनतेच्या प्रश्नावर गेली २५ वर्षे कार्य करत आहेत. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कार्ल मार्क्स, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ, संविधान प्रेमी नाशिककर चळवळीत योगदान देत आहेत. या कार्याचा गौरव करताना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे, असे आयोजक नाशिक लोकल चे संपादक सतीश रूपवते यांनी प्रतिपादन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विशेषांक प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश अनिल वैद्य यांनी भारतीय संविधान निर्मितीचे अनेक प्रसंग सांगितले. भारतीय संविधान जपण्यासाठी प्रत्यकाने योगदान मूल्य रुजवण्यासाठी दिले पाहिजे असे आवाहन केले. संपादक सतीश रूपवते यांनी प्रास्ताविक केले. आभार अविनाश आहेर यांनी मानले. या प्रसंगी विवीध शेत्रतील मान्यवर वी.डी.धनवटे, दत्तु तुपे, भास्कर शिंदे, पद्माकर इंगळे, जयंत खडताले, वामनराव गायकवाड, मुकूंद रानडे, माजी जिल्हाधिकारी बी.जी.वाघ, डॉ. वाघ आदी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय