Tuesday, May 21, 2024
Homeराजकारणमंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी घेतला महत्वाचा निर्णय

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी घेतला महत्वाचा निर्णय

अमरावती : राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडत आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा दोरदार सुरू आहे. अशात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

मी सध्याच्या राजकीय समीकरणाने नाराज नाही, उलट मी खुश आहे. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. आज मी निर्णय घेणार होतो. काल मी ‘इतनी शक्ती हमें दे न दाता’ ही प्रार्थना ऐकली आणि माझा मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो, पण मुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी मला फोन केले. १७ जुलैला मुख्यमंत्री शिंदे यांनी मला भेटीची वेळ दिली आहे. त्यानंतर १८ जुलैला मी निर्णय जाहीर करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटांमधील काही संभाव्य आमदारांना मुंबईतच राहण्यास सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, आमदार बच्चू कडू अद्याप त्यांच्या मतदारसंघातच असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय