Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये सर्प वैविध्य व संवर्धन या विषयावर व्याख्यान

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सर्प वैविध्य व संवर्धन या विषयावर व्याख्यान

हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये आय. क्यू.ए.सी. विभाग, इको वॉरियर नेचर क्लब आणि प्राणीशास्त्र विभागामार्फत नागपंचमीचे औचीत्य साधून सापांविषयी जागृती व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी ‘सर्प वैविध्य व संवर्धन’ या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. Lecture on Snake Diversity and Conservation at SM Joshi College, Hadapsar

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, इंदापूर येथील प्राणीशास्त्र विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. राजेंद्र साळुंखे उपस्थित होते. या व्याख्यानामध्ये डॉ.साळुंखे यांनी विषारी, बिनविषारी सर्प यामधील फरक समजावून सांगितला. सामान्य माणसाच्या मनात सापांविषयी असलेली भीती कमी करून त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढवली. तसेच आपला संपर्क सापांशी आल्यास आपण कोणती काळजी घ्यावी. सर्पाचे संरक्षण कसे करावे. याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. एच. एस. कारकर (सूक्ष्मजीव शास्त्र विभाग प्रमुख) होत्या. डॉ. ए.आर. पांढरबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एस. जी. आयनर यांनी पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ए. एच. पाटील व प्रा डी. आर. शेळके यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय