Junnar : घाटघर व अंजनावळे या गावात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीसोबत पंप स्टोरेज हा वीज निर्मिती प्रकल्प बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने सामंजस्य करार केला आहे. परंतु याबाबत या दोन्ही गावात प्रचंड विरोध आहे. ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना अजूनही हा नेमका प्रकल्प काय आहे याबाबत कुठलीही माहिती नाही. असे असताना अनुसुचित क्षेत्रामध्ये कोणत्याही भांडवली आणि पर्यावरण विरोधी प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदन किसान सभेच्या वतीने नायब तहसीलदार शांताराम किर्वे यांना दिले आहे. (Junnar)
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील आडोशी या अंजनावळे गावातील वस्ती जवळ अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून महाराष्ट्र शासन ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यामध्ये २८ जून २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात झालेल्या कराराअंतर्गत साधारणपणे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही समजते.
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यासाठी संविधानातील पाचवी अनुसूची व पेसा कायदा २००६ चे बंधन असताना या प्रकल्पाला परवानगी कुठल्या आधारे देण्यात आली, असा सवाल किसान सभेने केला आहे.
या प्रकल्पासाठी झालेला सामंजस्य करार, जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाला मंजुरी दिलेली नसताना आपल्या कार्यालयाने अवैधपणे सर्वेक्षणासाठी दिलेली परवानगी व या अवैध परवानगीच्या आधारे कंपनीने बनवलेला डीपीआर तसेच सर्व सुरू असलेले सर्व काम हे सर्व अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा व संविधानातील पाचव्या अनुसूचीतील तरतुदींचे उल्लंघन आहे. यामुळे सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या सर्व प्रक्रिया त्वरीत थांबवाव्यात, अशी मागणी देखील किसान सभेने केली आहे.
सर्वेक्षणाला ग्रामसभेची मान्यता नाही. व ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन आपण हे सर्वेक्षणाचे काम त्वरित स्थगित करावे. व या भागातील पेसा ग्रामसभेला डावलून पुढील काळात कोणताही निर्णय घेऊ नये. हे सर्वेक्षणाचे काम त्वरित थांबावे अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
निवेदन देतेवेळी किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणपत घोडे, किसान सभेचे कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, नारायण वायाळ, मुकुंद घोडे, संदीप शेळकंदे, संजय साबळे, किरण दाते, दादाभाऊ साबळे, किरण रावते, प्रविण गवारी आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला