Saturday, April 27, 2024
Homeताज्या बातम्याShivsena : शिवसेना शिंदे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर

Shivsena : शिवसेना शिंदे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर

First list of Shiv Sena : शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात यादीत एकुण ८ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आले आहे. मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक अशी एकुण ८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याणच्या जागे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे. (Shivsena)

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीची जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू होती, भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली मात्र शिवसेनेकडून (Shivsena) त्यांची यादी कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेने एकूण ८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाची पहिली यादी

मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
बुलडाणा – प्रतापराव जाधव
दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
कोल्हापूर – संजय मंडलीक
शिर्डी – सदाशिव लोखंडे

दरम्यान, या यादीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे गेली 2 टर्म खासदार असलेल्या कल्याणच्या जागेची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात आहे. त्यामुळे या जागा कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय